नागपूर,
mla khopade नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला चौथ्यांदा एकहाती सत्ता मिळाली आहे. यात पूर्व नागपूरचा सिंहाचा वाटा असल्याने सर्व विजयी उमेदवारांनी रविवारी आमदार कृष्णा खोपडे नेतृत्वात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. वर्धा मार्गावरील निवासस्थानी नितीन गडकरींना पुष्पहार घालून मिळालेल्या विजयाबददल अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रा. अनिल सोले, प्रमोद पेंडके, बाल्या बोरकर, प्रदीप पोहाणे, नवनिर्वाचित नगरसेवक संजय अवचट, राम आंबुलकर, चेतना निमजे, दीपक वाडीभस्मे,बाळू रारोकर, अर्चना पडोळे, संतोषकुमारी हाडोळे,सरिता कावरे, शारदा बारई, सीमा ढोमणे, पिंटू झलके आदींचा समावेश होता. मुख्यत: तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या निवडणूकीत भाजपने १५१ पैकी १०२ जागा मिळविल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत युतीच्या उमेदवाराने दोन जागा जिंकली असून भाजपाने नागपूर महानगरपालिकेवर सलग चौथ्यांदा नंबर वन पक्ष असल्याचे सिद्ध केले असल्याचे आ.कृष्णा खोपडे यांनी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहराच्या सर्वच भागात अनेक विकास कामे केली. यात पूर्व नागपूरात झालेल्या विकासकामांमुळे मतदारांनी भाजपाला पुन्हा संधी दिली आहे.mla khopade सर्व नवनिर्वाचित नगरसेवक प्रभागाच्या विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आ.खोपडे यांनी दिली.