वर्धा,
A silver throne for Hanuman : जय पवनसुतनगर जुनी म्हाडा कॉलनी येथील राम हनुमान मंदिरात अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन बुधवार ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी जय पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्टचा पुढाकार व भतांच्या सहकार्याने हनुमंताला चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगरसेवक सतीश मिसाळ, उज्वला पेठे, ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत राठी, मंदिराच्या अध्यक्ष शारदा फरताडे, माजी नगरसेवक प्रदीप ठाकरे उपस्थित होते. दिवाळीपूर्वी मंदिर ट्रस्टच्या वतीने हनुमंताला चांदीचे सिंहासन अर्पण करण्याचा मानस अध्यक्षांनी व्यत केला होता. भक्तांच्या प्रतिसादातून तसेच ट्रस्टच्या वतीने अल्पावधीतच सिंहासन तयार करण्यात आले. सिंहासनाकरिता साडेचार किलो चांदीचा वापर करण्यात आला असून त्यावर सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे़. ३१ रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा तिथीनुसार द्वितीय वर्धापन दिवस साजरा करण्यात आला़ या पावन पर्वावर हनुमंताला चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात आले. संचालन, प्रास्ताविक जय हनुमान मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रवीण होणाडे यांनी केले़. यावेळी सचिव नरेश झाडे, विश्वस्त शंकर चन्ने, नरेश शेवडे, संजय कराळे, सदस्य याद्निक बोकडे, दिनेश बोकडे, अजय कहाते, परीक्षित येंडे, दिनेश कठाणे, बालू ढगे, कमलाकर मुन, प्रशांत बावणे, सुनील मोहोड, मनिष देशमुख, अशोक फरताडे, सचिन गोपनारायण आदी उपस्थित होते़
यावेळी नगराध्यक्ष पांगुळ म्हणाले की, आपण स्वत: जय पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्टचा सदस्य असून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्य जवळून पाहिलेले आहे़. जनतेने आपल्याला नगराध्यक्ष म्हणून निवडूण दिले़ जनतेचा सेवक म्हणून मी सदैव आपल्यासाठी तत्पर राहील़ ट्रस्टचे धार्मीक, सांस्कृतिक व सामाजिक कार्य अधिक भक्कम कसे करता येईल, या दृष्टीकोणातून विविध उपक्रम तसेच सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले़.
त्याचप्रमाणे चंद्रकांत राठी यांनीही विचार व्यक्त केले़.