’सूपरमून’ दिसणार

02 Jan 2026 20:51:53
अमरावती,
supermoon : पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ३ जानेवारीला सूपरमून दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहिल. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार कि.मी. च्या आत असते त्याला सुपरमून असे म्हणतात.
 
 
K
 
चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तिव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरुन आपणला नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिनीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ३ जानेवारीला संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमिंनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सूपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल. अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0