आर्णीत बांग्लादेशी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन

02 Jan 2026 17:44:58
तभा वृत्तसेवा

आर्णी,
Bangladesh terrorism protest स्थानिक शिवाजी चौकात बांगलादेश येथे हिंदूंवर होणाèया अत्याचाराविरोधात आर्णी येथील विश्वहिंदू परिषद प्रेरित बजरंग दलाच्या वतीने 31 डिसेंबर रोजी शिवाजी चौकात बांग्लादेशी दहशतवाद्यांचा पुतळा दहन करण्यात आला. यावेळी बांग्लादेश प्रमुखाच्या प्रतिमेला जोडे व चपला मारत घटनेचा निषेध करण्यात आला.
 
Arni, Bangladesh terrorism protest
 
बांग्लादेशात हिंदू युवक दीपू चंद्र दास याची हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर इस्लामचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. दररोज हिंदू नागरिकांवर होणारे अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ आर्णी येथील शिवाजी चौकात विहिंप बजरंगदल, समस्त हिंदुत्ववादी संघटना व हिंदू समाजाकडून निषेध आंदोलन करण्यात आले होते.भारत सरकारने बांग्लादेश सरकार व आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांग्लादेशसोबत असलेली नातेसंबंध आणि आर्थिक देवाण-घेवाणवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवाजी चौकात सकल हिंदू समाज विहिंप, बजरंगदल, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0