भानुताई गडकरी डायग्नोेस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफीचे लोकार्पण

02 Jan 2026 17:56:05
नागपूर,
Bhanutai Gadkari केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्व. भानुताई गडकरी मेमोरिअल डायग्नोेस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफीचे लोकार्पण करण्यात आले.अंकुर सीड्सच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या या सुविधेचे लोकार्पण अंकुर सीड्सचे अध्यक्ष रवि काशीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नितीन गडकरी, कांचन गडकरी, अंकुर सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक माधवराव शेंबेकर, संचालक मकरंद सावजी, संचालक दिलीप रोडी, विजयी भारत संस्थेचे सचिव प्रभाकर येवले, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 Bhanutai Gadkari Diagnostic Center, Nagpur, sonography inauguration
 
या डायग्नोेस्टिक सेंटरचे 27 जुलै 2025रोजी उद््घाटन झाल्यानंतर सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील रुग्णांना एमआरआय, सिटी स्कॅन, डायलिसीस, एक्स-रे, पॅथॉलॉजी, जनेरिक औषधांच्या सुविधांचा जवळपास दहा हजार रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये आता सोनोग्राफीच्या सुविधेची भर पडली आहे. अत्याधुनिक व स्वदेशी असलेल्या या उपकरणाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण चाचण्या होणार आहेत. ही सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे.
 
 
रवि काशीकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाèया या उपक्रमात योगदान देता आले, याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नितीन गडकरी यांनी यावेळी अंकुर सीड्सच्या व्यवस्थापनाचे आभार मानताना अधिकाधिक गरीब रुग्णांना या सुविधेचा लाभ देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास व्यक्तकेला. यावेळी प्रतिमा रोडी, सारंग गडकरी, मधुरा गडकरी, अविनाश घुशे, अतुल मंडलेकर, प्रकाश टेकाडे, हेमंत गडकरी, दिलीप धोटे, संजय टेकाडे, दर्शन पांडे यांच्यासह स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मनीष केडिया, डॉ. पराग मून, डॉ. बंसल, डॉ. आस्था खेमका, डॉ. रोहित बडगे, डॉ. अभिजित ढवळे यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. श्रीरंग वराडपांडे व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0