तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
birth-certificate-case : आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीत गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त जन्म-मृत्यू नोंदी आढळल्याने शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या पथकाने एका आरोपीला बिहार येथून ताब्यात घेतले आहे.
आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतच्या सीआरएस सॉफ्टवेअर लॉगिनमध्ये सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत 27,397 जन्मनोंदी व 7 मृत्यूनोंदी आढळून आल्या. गावाची लोकसंख्या केवळ सुमारे 1,400 असून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी आढळणे हे संशयास्पद असून, या नोंदी सायबर फसवणुकीचा गुन्हा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रारदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष शहाजी धोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतच्या सीआरएस सॉफ्टवेअर लॉगिनमध्ये सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत 27, 397 जन्म नोंदी व 7 मृत्यू नोंदी आढळून आल्या.
या गुन्ह्याची व्याप्ती, किचकट स्वरूप आणि तांत्रिक गुंतागुंत लक्षात घेता, पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्याकडे सोपविला होता. तपासादरम्यान दिनेश बैसाने यांनी बनावट प्रमाणपत्र तयार होण्याच्या प्रक्रियेचा सखोल तपास केला. संबंधित प्रणाली हाताळणाèया अधिकारी व कर्मचाèयांकडून तपशीलवार माहिती घेण्यात आली. प्रारंभीच्या तपासात बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचे कार्य स्थानिक पातळीवर न होता बाहेरील राज्यातून सायबर माध्यमांतून केल्या गेले आहे. सखोल तपासासाठी तांत्रिक विश्लेषण पथक व विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. प्राप्त तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पथकाला बिहार राज्यात पाठविण्यात आलेे.
जिथे संबंधित आरोपीचा ठावठिकाणा लागला. तपासादरम्यान आरोपी आदर्शकुमार अशोक दुबे (वय 20 वर्षे, ग्राम पंडितपूर, पोस्ट पंडीतपूर, पंचायत किसनपूर लौवार, ब्लॉक लहलादपूर, ता. किशुनपूर, जि. सारण, राज्य बिहार) याने या सायबर फसवणुकीत थेट सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीस 30 डिसेंबर 2025 रोजी बिहार राज्यातील जनता बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. आरोपीस शुक्रवार, 2 जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, तपास अधिकारी दिनेश बैसाने यांनी सादर केलेल्या युक्तीवादानुसार व आवश्यक तपासाच्या दृष्टीने न्यायालयाने आरोपीस सोमवार, 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर, सहापोलिस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार, सागर भारस्कर, गजानन कोरडे, मिलिंद दरेकर, मोहंमद भगतवाले, विकास कमनर, प्रवीण उईके, अजय निंबोळकर, अविनाश सहारे, अभिनव बोंद्रे, पूजा भारस्कार यांनी केली.