भाजपच्या माजी नगरसेवकासह दोन पदाधिकार्‍यांचे राजीनामे

02 Jan 2026 19:50:45
बुलढाणा,
buldhana-news : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अरविंद होंडे व भाजपच्या प्राथमिक सदस्य तसेच बुथ प्रमुख सक्रिय कार्यकर्ते पद्मनाभ जगदेवराव बाहेकर व वैभव दिलीप इंगळे यांनी दि. २ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सादर केले आहे.
 
 
 

JIK
 
 
 
 
 
पद्मनाभ जगदेवराव बाहेकर यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले की नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या राहत्या प्रभागातून उमेदवारीसाठी दावा व अर्ज सादर करूनही त्यांच्या दीर्घकालीन सेवेचा व निष्ठेचा विचार न करता इतर पक्षातून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दुसर्‍या प्रभागात तयारी करायला लावून तेथेही काँग्रेसमधून आलेल्या उमेदवाराला वेळेवर उमेदवारी देण्यात आल्यामुळे आपण व्यथित झाल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
 
 
त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व बूथ प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. वैभव इंगळे व अरविंद होंडे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले की गेल्या २० वर्षापासून भाजप चा प्राथमिक सदस्य असून पक्षाचा शहर सरचिटणीस व २०१६ मध्ये नगरपरिषद निवडणुकी मध्ये नगरसेवक व गटनेता म्हणून पक्षाचे निष्ठेने काम केल आहे दरम्यान शहर भाजप मध्ये असमन्वय व वैचारिक भिन्नता असल्यामुळे या नुकत्याच डिसेंबर २०२५ या वर्षी झालेल्या नप सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. पक्षाच्या नेत्यांच्या कार्याला कंटाळून नेत्यांच्या हेखेखोरपणाच्या स्वभावामुळे व त्यांच्या स्वभावाला कंटाळून मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0