कारंजा लाड,
blood donation camp नवीन वर्षाची सुरुवात समाजसेवेच्या संकल्पाने करण्यासाठी कारंजा रक्तदान चळवळीच्या वतीने जानेवारी महिन्यात कारंजा शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हेच blood donation camp सर्वश्रेष्ठ दान या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात येणार्या या शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही शिबिरात सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रविवार, ५ जानेवारी रोजी ब्लु चिप कॉन्व्हेंट व गुड मॉर्निंग ग्रुप च्या वतीने शहरातील महेश भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात संत गाडगेबाबा रक्तपेढी, बडनेरा यांच्यावतीने रक्त संकलित केल्या जाईल. शनिवार, १० जानेवारी रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या वतीने कारंजा शहरातील महेश भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या रक्तदान शिबिरात जिल्हा शासकीय रक्तपेढी वाशीम च्या वतीने रक्त संकलन केले जाणार आहे. ११ जानेवारी रोजी काळे परिवार व स्व. सुशील पाटील काळे मित्र मंडळ च्या वतीने सुद्धा शहरातील महेश भावनाताच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पीडीएमसी अमरावतीच्या वतीने रक्त संकलन केले जाणार आहे. सोमवार, १२ जानेवारी रोजी श्रीकांत माने (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती) यांच्यावतीने रक्तदान शिबिरा आयोजित करण्यात आले असून या शिबिरात जिल्हा शासकीय रक्तपेढी वाशीम च्या वतीने रक्त संकलन केले जाईल. तर बुधवार, १५ जानेवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने रक्तदान शिबिर संभावित आहे. यात डॉटर हेडगेवार रक्तपेढी अकोला रक्त संकलन करणार आहे.
या उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणावर रक्तसाठा उपलब्ध होऊन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ मदत मिळणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे रक्तदान करून या चळवळीत सहभागी व्हावे तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कारंजा रक्तदान चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.