सीईओंचा गाव भेट अभियानाचा आष्टीतून श्रीगणेशा

02 Jan 2026 20:22:47
वर्धा, 
ceo-village-visit-campaign : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘एक दिवस सीईओंसोबत’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा आष्टी तालुयातून करण्यात आला. ३१ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी आष्टी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना भेटी देत येथील विकास कामांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
J
 
नावीण्यपूर्ण उपक्रमाच्या श्रीगणेशादरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी गाव भेटी देऊन विकास कामाची पाहणी करून गटविकास अधिकारी नागेश ढोरे, विस्तार अधिकारी हर्षल कलोकार तसेच इतर अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली.
 
 
 
मुख्य कार्यकारी अधिकारीसोमन यांनी प्रथम ग्रामपंचायत नवीन रामदरा येथे अभियानाविषयी आढावा घेत ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. त्यानंतर ग्रामपंचायत परिसरातील अभ्यासिका तसेच वाचनालयाचे उद्घाटन त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलास गृहप्रवेश म्हणून प्रतिकात्मक चावी मुख्य कार्यकारी अधिकारी सोमन यांच्या हस्ते वाटप करण्यात अली. नवीन रामदरा येथील स्मशानभूमी परिसरात ४०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवड करताना वडाच्या रोपांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्याची पाहणीही त्यांनी केली. नंतर अंगणवाडी तसेच शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी लागवड केलेल्या परसबागेची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना कचर्‍याचे विलगीकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. शिवाय दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सर्वात जास्त प्लास्टिक कचरा जमा केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत मार्फत भेटवस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माझ्या स्वप्नातील गाव या कवितेसह भाषणाने झाली.
 
 
तळेगाव येथील जलसंधारण कामांची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर चिस्तुर ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी परस बागेतील सेंद्रिय भाजीपाला विकून त्यातून प्राप्त झालेल्या पैशातून शाळेकरिता उपयोगी वस्तू खरेदी आदी उपक्रमाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सोमन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. येथील अंगणवाडी भेटीदरम्यान सर्व घटकांच्या पुर्ततेबाबत आढावा घेत त्यांनी अंगणवाडीत वापरण्यात येणारे खाद्य पदार्थांचीही तपासणी केली. चिस्तुर ग्रामपंचायत अंतर्गत मंदिर परिसरामध्ये वृद्धांसाठी विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
 
 
लहान आर्वी ग्रामपंचायत अंतर्गत आरोग्य केंद्रालाही त्यानी भेट देत त्यांनी आरोग्य विषयक सूविधांचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी सोमन यांनी गरोदर महिला, महिला भजन मंडळाचे सदस्य आदींची संवाद साधला. तसेच ग्रामपंचायत लहान आर्वी अंतर्गत लिंगापूर येथील सन २०२३-२४ मध्ये राज्यस्तरावर क्रमांक घेतलेल्या परसबागेला भेटही दिली.
Powered By Sangraha 9.0