नागपूर,
Datta Meghe Ayurveda College दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेदिक औषधनिर्मिती अंतर्गत मलम तयार करण्याचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमात पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
प्रात्यक्षिक दरम्यान मलम तयार करण्याची शास्त्रीय प्रक्रिया, औषधी द्रव्यांची निवड व प्रमाण तसेच त्याचे औषधी उपयोग यांची माहिती देण्यात आली. Datta Meghe Ayurveda College यावेळी प्रा. डॉ. पूनम मदान, डॉ. वासवी तोटावार आणि डॉ. संतोष पुसदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभव मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सौजन्य:निकिता लुटे,संपर्क मित्र