देवठाणा ते कारपा खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोको

02 Jan 2026 18:10:09
मानोरा,
Devthana गोरसेना ह्या सामाजिक संघटनेने सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठलीच कारवाई केल्या जात नसल्याने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन उपरोक्त संघटनेच्या वतीने समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तालुका प्रशासनाला दिले आहे.
 

Devthana to Karpa road repairc 
देवठाणा कारपा हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, रस्त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे असून, संपूर्ण रस्त्याची चाळणी चाळणी झालेली आहे. त्यामुळे कित्येक वाटसरूंना अपघाताला सामोरे जावे लागलेले आहे. विशेष म्हणजे ह्या रस्त्याची मागील पाच वर्षापासून कुठल्याही प्रकारे देखभालच केल्या गेली नसून, याबाबत कारपा ग्रापं सरपंच,उपसरपंच व सर्व नागरिक यांनी २९ जानेवारी २०२५ ला पूर्णपणे दुरुस्ती करण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु, ह्या गोष्टीला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. पण आपल्या विभागांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नसून, हा कारपा व देवठाणा ग्रामवासीयावर झालेला मोठा अन्याय आहे. एकतर शासन रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करतो आणि आपण व कार्यालय मात्र याबाबतीत फारसे गंभीर नाही हे मागील एका वर्षापासून कोणतेही कार्यवाही न केल्यामुळे दिसून येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या मार्गावरून वीस-पंचवीस गावांची सतत येजा होत असून, शाळेतील विद्यार्थी, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलिस स्टेशन, कृषी विभाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना शेताच्या मालाची ने आण याच मार्गाने करावी लागते. मात्र, सुस्त व झोपलेल्या प्रशासनाने या बाबतीत दखल आजपर्यंत घेतले नाही म्हणून येत्या सात दिवसात हा रस्ता दुरुस्त न केल्यास गोरसेना व कारपा येथील गावकरी यांच्या वतीने, मानोरा मंगरूळनाथ मार्गावर मातोश्री सुभद्राबाई पाटील कॉलेजच्या मुख्य रस्त्यावर ३ जानेवारी २०२६ ला सकाळी ११.३० वाजता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. पुढील उद्भवणार्‍या परिस्थितीस आपण आपले कार्यालय जबाबदारी आपण खबरदारी घ्यावी. असे गोर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
रास्ता रोको करण्याबाबत पोलिस स्टेशन च्या ठाणेदार नयना पोहेकर यांना सुद्धा पत्र देण्यात आलेल आहे.निवेदनावर गोपाल चव्हाण, सुनिल राठोड, पंकज चव्हाण, राजु राठोड, विकास चव्हाण, विनोद चव्हाण, उल्हास चव्हाण, विजय राठोड, रमेश राठोड, आनंदा मनवर, सहदेव राठोड, प्रमोद चव्हाण, विजय राठोड, विनोद राठोड, दत्ता राठोड, रमेश राठोड आदीच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.
Powered By Sangraha 9.0