धुळे,
dhule municipal elections धुळे महापालिकेच्या ७४ नगरसेवक जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला महत्त्वाचे प्रारंभिक यश मिळताना दिसत आहे. निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपाच्या चार नगरसेवकांची बिनविरोध निवड निश्चित झालेली आहे, तर प्रभाग क्रमांक १७ अ मध्ये अमोल मासुळे यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
भाजपाने यंदा धुळे dhule municipal elections महानगरपालिकेत ६३ उमेदवारांना तिकीट दिले आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांनी अनेक बंडखोरांना हाताशी घेत त्यांना उमेदवारी दिली होती; मात्र भाजपाच्या हिंदुत्व आणि देशहिताच्या भूमिकेच्या प्रभावामुळे अनेकांनी माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक १७ अ मध्ये, शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आणि अपक्ष उमेदवार माघार घेतल्यामुळे अमोल मासुळे यांचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार थेट भाजपात सामील झाला आहे.भाजपच्या या बिनविरोध पद्धतीवर विरोधकांकडून प्रश्न उठवले जात आहेत. शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी आरोप केला की भाजप नेते आणि स्थानिक प्रतिनिधी दबाव टाकून विरोधकांना माघार घ्यायला लावत आहेत. विरोधकांनुसार, ही पद्धत लोकशाही विरोधी असून “लोकशाहीची हत्या” आहे.
याबाबत मंत्री जयकुमार dhule municipal elections रावल यांनी सांगितले की, नाराज झालेल्या भाजपा महिला जिल्हाध्यक्षांना विरोधकांकडून उमेदवारी देण्यात आली असली तरी, राजकारण फक्त आमिष दाखवून टिकत नाही. त्यांनी खुल्या आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. रावल म्हणाले की राज्यात भाजपला जनतेचा पूर्ण पाठिंबा असून धुळे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा आमचा मानस आहे.धुळे जिल्ह्यातील बिनविरोध पद्धती राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. दोंडाईचा नगरपालिकेतील संपूर्ण बिनविरोध आणि धुळे महापालिकेत चार नगरसेवकांचा बिनविरोध यामुळे भाजपाचा हा “बिनविरोध पॅटर्न” विरोधकांच्या लक्षात आला आहे.धुळे महापालिका निवडणूक ७४ जागांसाठी पार पडत आहे, आणि प्रारंभिक अंदाजानुसार भाजपाची परिस्थिती मजबूत दिसत आहे. मात्र विरोधकांच्या आरोपामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर चर्चा सुरू आहे.