तभा वृत्तसेवा
दारव्हा,
dr mayur ladolye तालुक्यातील मूळ रहिवासी तथा रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे कार्यरत असलेले सहायक प्रा. डॉ. मयूर रामराव लाडोळे यांची सायंटिफिक हाय लेव्हल विझिटिंग फेलोशिप 2025 साठी निवड झाली आहे. ही फेलोशिप संपूर्ण भारतातून अत्यंत मोजक्या व निवडक प्राध्यापकांना दिली जाते.या प्रतिष्ठीत फेलोशिप अंतर्गत डॉ. मयूर लाडोळे यांनी फ्रान्स येथील विद्यापीठात तब्बल 15 दिवसांचे उच्चस्तर संशोधन कार्य पूर्ण केले आहे. रसायन अभियांत्रिकी व अत्याधुनिक केमिकल रिसर्च क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने ही फेलोशिप अत्यंत महत्वाची मानली जाते.
डॉ. मयूर लाडोळे यांनी रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रीकी विषयात आचार्य पदवी संपादन केली आहे. ही पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या शैक्षणीक गुणवत्तेची दखल घेत त्यांची युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन, आयर्लंड येथे पोस्ट-डॉक्टोरल रिसर्चसाठी निवड झाली. तेथेही त्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. शिक्षण, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि संशोधनावरील निष्ठेच्या जोरावर डॉ. मयूर लाडोळे यांनी हे यश मिळवले असून त्यांच्या या आंतरराष्ट्रीय निवडीमुळे दारव्हा तालुक्याचे नाव देशपातळीवर व जागतिक स्तरावर चमकले आहे. या यशाबद्दल डॉ. मयूर लाडोळे यांचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच दारव्हा तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.