शेतकरी कुटुंबास स्व. गोपीनाथ पिक विमा योजनेमार्फत २ लाखाची मदत

02 Jan 2026 20:41:05
बुलढाणा, 
crop-insurance-scheme : महाराष्ट्र शासनाच्या स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत बुलढाणा तालुयातील येळगाव येथील स्व. शेषराव रामदास विरशीद यांच्या कुटुंबास २ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती. दरम्यान, १ जानेवारी रोजी सदर मदतीचा मंजुरी आदेश त्यांच्या पत्नी रंजना शेषराव विरशीद यांना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
 
 
K
 
 
 
येळगाव येथील शेतकरी स्व. शेषराव रामदास विरशीद (वय ४०) हे शेतात कीटकनाशक औषधाची फवारणी करत असताना अंगात किटकनाशक गेल्याने गंभीर आजारी पडले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ६ ऑगस्ट २०२४ रोजी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा तसेच आई-वडील असा मोठा आप्त परिवार असून, कुटुंबावर अचानक मोठे आर्थिक संकट कोसळले होते. या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी तत्काळ दखल घेत संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मदत मंजूर करून घेतली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पीडित कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळू शकली.
 
 
यावेळी बोल-ताना आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, शेतकरी व शेतमजूर कुटुंबांवर येणार्‍या संकटाच्या काळात शासनाच्या विविध योजनांचा लाभत्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यातही सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी अजय वाढे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिदे, शिवसेना विभागप्रमुख तथा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुमंत इंगळे, सरपंच दादाराव लवकर, किसानसेना सरचिटणीस अशोक गडाख, शाखाप्रमुख नितीन मानमोडे, कृषी पर्यवेक्षक भास्कर शेळके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0