जिल्ह्यात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे!

02 Jan 2026 20:09:06
वर्धा, 
kharif-crops : जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे इतकी असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील निम्मे व्यती आणि कुटुंब शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत. तर ग्रामीण भागात अनेकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ४४२ लागवड क्षेत आहे. त्यापैकी ३ लाख ९३ हजार ९५८ हेटरवर यंदा खरीप हंगामात विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. तर ४० हजार ४८४ हेटर जमीन पडीक राहिली. यंदा खरीपाच्या सुरुवातीला पावसाने थोडी हुलकावनी दिली. नंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन, तूर आदी खरीप पिकांची लागवड केली.
 
 
 
JK
 
 
 
अंकुरलेले पीक वाढीच्या अवस्थेत असताना जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत पूरपरिस्थितीचे संकट ओढावले. याच नैसर्गिक संकटाचा मोठा फटका पिकांना बसला. तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवर यलो मोझॅक व चारकोल रॉटने अटॅक केला. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि विविध संकटांमुळे शेतकर्‍यांना शेतीतून कमीच उत्पन्न झाले. याच सर्व बाजूंची पडताळी केल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
 
कारंजा तालुक्यात सर्वाधिक पडीक जमीन
 
 
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ४० हजार ४८४ हेटर जमीन पडीक राहिली. वर्धा तालुयात ७४१ हेटर, सेलू ५ हजार ४७४ हेटर, देवळी ३ हजार ३७५ हेटर, आर्वी ६ हजार ६३१ हेटर, आष्टी १ हजार ५९१ हेटर, हिंगणघाट ४ हजार ४३४ हेटर, समुद्रपूर ५ हजार १५५ हेटर तर कारंजा तालुक्यात तब्बल १३ हजार ८३ हेटर जमीन पडीक राहिली.
 
 
ओलांडला नाही ५० पैशाचा उंबरठा
 
 
जिल्ह्यातील १३८७ गावांपैकी ४८ गावांची पैसेवारी प्रामुख्याने पाण्याखाली, अकृषीक, प्रकल्पांतर्गत काही कारणांमुळे जाहीर करण्यात आलेली नाही. तर खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या उर्वरित १३३९ गावांची पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे. पैसेवारी जाहीर न करण्यात आलेल्या गावांमध्ये वर्धा तालुयातील १, सेलू ९, देवळी २, आर्वी १४, आष्टी १८, कारंजा १ तर समुद्रपूर तालुयातील ३ गावांचा समावेश आहे. वर्धा तालुयात ४५ पैसे, सेलू ४७ पैसे, देवळी ४६ पैसे, आर्वी ४७ पैसे, आष्टी ४८ पैसे, कारंजा ४८ पैसे, हिंगणघाट ४६ पैसे तर समुद्रपूर तालुयात ४७ पैसे आणेावारी घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0