सेलू,
selu-news : सेलू तालुक्यात सध्या इमारत बांधकाम कामगाराचे अर्ज भरणे सुरू असून या अर्जावर ग्राम पंचायत अधिकारी व कंत्राटदार यांच्या सह्या व शिक्का बनावट असल्याचे प्रकरण उघडकीस आले असून यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात अनेक जण इमारत बांधकाम कामगाराच्या अर्जाचे काम करून देत असून ग्राम पंचायत अधिकारी व ठेकेदाराच्या सही शियाची गरज असते. त्यासाठी काही दलाल काम करीत असून लाभार्थ्यांपासून अधिकचे पैसे घेऊन ग्राम पंचायत अधिकारी व ठेकेदाराच्या सह्या घेईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण ग्राम पंचायतची पायरी न चढताच पैसे देऊन मोकळे होतात.

पण, काही महिन्यांपासून तालुयातील काही ग्रामपंचायत अधिकार्यांना या बाबत संशय येत होता. पण कोणीही पुढे सरसावत नव्हते. दरम्यान, तालुयातील एका ग्राम पंचायतमध्ये हे प्रकरण उघडकीस आले आहे. ग्रामपंचायतमध्ये इमारत बांधकाम कामगारांचा आलेल्या अर्जाची खतावणी करून अनुक्रमांक दिला जातो. पण, ज्या अनुक्रमांकावर ज्याचे नाव आहे त्याच तोच क्रमांक टाकून दुसर्याला दलालाने दुसर्याचा अर्ज भरल्याने प्रकरण उघड आले असून बनावट शिक्का मारून ग्राम पंचायत अधिकार्यांची हुबेहुब स्वाक्षरी केल्याचे आढळून आले.
तर ज्या ठेकेदाराचे नाव व सही आहे तो ठेकेदार या तालुयात काही वर्षांपूर्वी कंत्राट घ्यायचा. पण, दहा वर्षापासून या तालुक्यात राहत नसल्याचे बोलल्या जात आहे. याबाबत एका ग्राम पंचायत अधिकार्यांनी इमारत बांधकाम कामगार जिल्हा व तालुका कार्यालयात तक्रार केल्याचे समजते. यावर बांधकाम कामगार अधिकारी कोणती कारवाई करतात की प्रकरण गुलदस्त्यात बंद करतात याकडे लक्ष लागले आहे.
आता अनेक ग्रापंमध्ये असे घडले काय घडले असेल तर ग्राम पंचायत अधिकारी संघटना अश्या बोगस स्वाक्षरी व शिक्का वापरणार्या दलाला बाबत तक्रार करणार काय हे महत्त्वाचे ठरणार आहे.