हिंदू अत्याचाराविरुद्ध वरूड कडकडीत बंद

02 Jan 2026 20:53:14
वरूड, 
hindu-atrocities-warud : बांगलादेशात हिंदूवर होणार्‍या अमानवीय अत्याचाराविरुद्ध सकल हिंदू समाजाने वरूड शहरातील बाजारपेठ शुक्रवारी १०० टक्के बंद ठेऊन व मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होत तीव्र निषेध करण्यात आला. भारत सरकारने याबाबत कठोर पाऊले उचलावी अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.
 
 
 
WARUD
 
 
 
निवेदनानुसार, बांगलादेशातील हिंदू असुरक्षित असून येथील परधर्मिय लोकांकडून अमानवीय अत्याचार केल्या जात आहे. याकरिता भारत सरकारने कठोर पाऊले उचलून कार्यवाही करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार २ जानेवारी रोजी वरूड शहरातील बाजारपेठ १०० टक्के कडकडीत बंद ठेऊन दुकानदारांनी तीव्र निषेध नोंदवला. नगरपरिषद शाळेच्या प्रांगणातून सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला, हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदारामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन कठोर कारावाईची मागणी करण्यात आली.
 
 
 
यावेळी सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते तहसील कार्यालयात उपस्थित होते. यावेळी बांगलादेश विरोधी घोषणा देण्यात आल्या. महात्मा फुले चौकात निषेध सभा पार पडली .यावेळी बजरंग दलाचे चंदू कडू, सतीश धूमटकर, विक्की ठाकूर, प्रमोद बोंडे, माजी सैनिक अशोक नानोटकर, नगराध्यक्ष ईश्वर सलामे, माजी नगराध्यक्षा जया नेरकर, गटनेते किरण सावरकर, योगेश्वर खासबागे, जिवन मालपे, नंदू काळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्याकडून शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
 
 
Powered By Sangraha 9.0