मुंबई,
krantijyoti vidyalay marathi medium नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी चित्रपटसृष्टीत एक सकारात्मक व उत्साही बातमी ऐकायला मिळाली आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. मराठी भाषा आणि शाळेच्या महत्त्वावर आधारित या चित्रपटाने सामाजिक वास्तव आणि शिक्षणव्यवस्थेतील गंभीर विषय सोप्या व प्रभावी पद्धतीने मांडल्याचे पाहायला मिळाले.
चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी हा सिनेमा तयार केला असून, त्यांनी कथानकात ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जिवंत ठेवा’ हा संदेश प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. प्रेक्षकांनी चित्रपट पाहून त्याबद्दल उत्साही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी आपली भावना व्यक्त करत, “हा चित्रपट केवळ मराठी शाळेची कथा नाही, तर आपल्या मराठी भाषेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या संघर्षाची कथा आहे,” असे म्हटले आहे. तर काहींनी चित्रपटाचे कौतुक करत “कमाल चित्रपट, शब्द कमी पडतील… एकदा नक्की पाहा,” असे आवाहन केले आहे.
सिनेमाचे बजेट २ कोटी रुपये असून, पहिल्याच दिवशी त्याने १८ लाखांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने तब्बल २० लाखांची कमाई करून निर्मात्यांचे आणि संपूर्ण टीमचे चेहरे हास्याने उजळले आहेत. चित्रपटाच्या या यशामुळे त्याला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात मिळाली आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय: krantijyoti vidyalay marathi medium मराठी माध्यम’मध्ये ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसतात. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी दमदार भूमिकेत आहेत. संपूर्ण कलाकारांची कामगिरी प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे, तर चित्रपटातील संगीत आणि गाणीही विशेष कौतुकास पात्र ठरत आहेत.एकंदरीत, ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही तर तो सामाजिक संदेश आणि मराठी शाळा-संरक्षणाचा मोहक आह्वान प्रेक्षकांसमोर मांडतो. पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादानंतर असे दिसते की, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.