देवळी,
Rajesh Bakane सर्वसामान्य नागरिकांना हकाचे घर मिळावे, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन व्हावे आणि प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित निवारा मिळावा या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणानुसार व मार्गदर्शनाखाली वर्धा तालुयात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला. आ. राजेश बकाने यांच्या हस्ते वर्धा तालुयातील ३३ गावांमधील ४८१ अतिक्रमणधारक लाभार्थ्यांना घरकुलाचे अधिकृत पट्टे वितरित करण्यात आले. त्यांना हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी आ. राजेश बकाने म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेत आहे. घरकुलाच्या प्रश्नावर शासनाने दाखवलेली संवेदनशीलता आज प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे. ४८१ कुटुंबांना हकाचे पट्टे देणे हे केवळ प्रशासकीय काम नाही. त्यांच्या जीवनात सुरक्षितता, स्वाभिमान आणि स्थैर्य देणारा ऐतिहासिक निर्णय आहे. या पट्ट्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आता प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यत केला.
यावेळी वर्धा उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, तहसीलदार सागर पुंडेकर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांच्यासह महसूल व ग्रामीण विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, गौरव गावंडे, जयंत कावळे, किरण उरकांदे, नंदकिशोर झोटींग, महेश आगे, प्रवीण काटकर, विवेक भालकर, सुधीर बावणे, विनोद तिमांडे, विनोद गायकवाड, वैशाली उघडे, महेश देवढे, प्रशांत तिगावकर, दिलीप रघाटाटे, अरुण भोयर, स्वप्निल पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. बकाने यांनी महसूल प्रशासन, पंचायत समिती, ग्रामसेवक तसेच सर्व सहकार्य करणार्या घटकांचे आभार मानले.