घरात बंद करून उमेदवारीस पाठिंबा! नागपुरात नेमकं काय चाललंय?

02 Jan 2026 12:18:51
नागपूर,
kisan gavde राज्यातील २९ महापालिका निवडणुका धामधुमीत सुरू असून फक्त १३ दिवसांत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड, सीट वाटाघाटी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली असून आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. या काळात अनेक पक्षांत बंडखोर उमेदवारांना शांत करण्यासाठी नेते आणि पदाधिकारी धावपळ करत आहेत. मात्र नागपूरमध्ये ही राजकीय धगधगती परिस्थिती एका अनोख्या प्रकाराने चर्चेत आली आहे.
 

kisan gavde 
नागपूरच्या प्रभाग kisan gavde क्रमांक १३ ड मधील अपक्ष उमेदवार किसन गावडे यांना त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरातच बंद करून उमेदवारीस पाठिंबा दिला. भाजपकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता, मात्र तो रद्द झाल्यानंतर गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. भाजपने त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते, मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांच्या समर्थकांनी गावडे यांना त्यांच्या घरातच थेट बंद करून बाहेर न येण्यास सांगितले.
 
 
गावडे यांचे घराबाहेर kisan gavde लोकांनी दाराला कुलूप लावले आणि “आपण उमेदवारी मागे घेणार नाही, आम्हाला तुम्ही हवे आहात” असा संदेश दिला. यावेळी घराबाहेर समर्थकांनी ठिय्या आंदोलन केले आणि घोषणाद्वारे उमेदवारीस समर्थन व्यक्त केले. काही वेळा हा प्रकार थोडा हाय व्होल्टेज ड्रामासारखा दिसला, मात्र तो उमेदवार आणि स्थानिक नागरिकांमधील असामान्य परंतु भावनिक नाते दर्शवणारा ठरला.या घटनेने नागपूरमधील निवडणूक रणसंग्रामात नवीन वळण आणले असून, उमेदवारांच्या इच्छाशक्ती आणि नागरिकांच्या सहभागाची अनोखी झलक प्रकट झाली आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील ही घटना निवडणुकीच्या वातावरणात वादळी आणि रंगतदार क्षण म्हणून स्मरणात राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0