‘सगळी मस्ती देवा भाऊंचा बुलडोझर उतरवेल’; वादग्रस्त गाण्यावर नितेश राणेंचा इशारा

02 Jan 2026 15:47:22
मुंबई, 
nitesh-rane-warning-over-controversial-song मुंबईलगतच्या नायगाव परिसरात एका सलूनमध्ये काश्मीरविषयी वादग्रस्त गाणे वाजवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणावर मंत्री आणि भाजपा नेते नितेश राणे यांनी तीव्र इशारा देत, “सगळी मस्ती देवा भाऊंचा बुलडोझर उतरवेल,” असे विधान केले आहे.
 
nitesh-rane-warning-over-controversial-song
 
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी परिसरात पोलिस खासगी वाहनातून गस्त घालत होते. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास, दुर्गा माता मंदिरासमोर, करमडपाडा येथील ‘रूहान हेअर कटिंग सलून’मध्ये लाऊडस्पीकरवर काश्मीरसंदर्भातील वादग्रस्त गाणे मोठ्या आवाजात वाजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे गाणे भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेविरोधात असल्याचे आढळून आले. त्यामुळे समाजात द्वेष, वैरभाव निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सलूनमध्ये प्रवेश केला. nitesh-rane-warning-over-controversial-song तेथे दोन व्यक्ती आढळून आल्या.
पोलिसांनी चौकशी केली असता, त्यापैकी एकाने आपले नाव गुलजारी राजू शर्मा असे सांगितले. तो पालघरचा रहिवासी असून सलूनमध्ये काम करत असल्याचे त्याने सांगितले. nitesh-rane-warning-over-controversial-song दुसरी व्यक्ती आपल्या मोबाईल फोनद्वारे ब्लूटूथच्या सहाय्याने सलूनमधील स्पीकरवर मोठ्या आवाजात ते वादग्रस्त गाणे वाजवत होती, जे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही ऐकू जात होते. या व्यक्तीने आपले नाव अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह (वय २५) असे सांगितले. तो सध्या पालघर येथे राहत असून मूळचा उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता, यूट्यूब अ‍ॅपवरून हे वादग्रस्त गाणे वाजवले जात असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता, संताप आणि तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. nitesh-rane-warning-over-controversial-song त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करत, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १९७(१)(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास नायगाव पोलीस करत आहेत.
Powered By Sangraha 9.0