तभा वृत्तसेवा
राळेगाव,
state bank of india ralegaon ‘प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना’अंतर्गत भारतीय स्टेट बँक शाखा राळेगावच्या वतीने पिंपरी (दुर्ग) येथील शरद कोवे यांना शाखा प्रबंधक वर्षा ओरके यांच्या उपस्थित दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मृतक आरती शरद कोवे (पिंपरी दुर्ग) या महिलेचा मृत्यू 16 ऑगस्ट 2024 ला आकस्मिक झाला होता. मृतक आरती कोवे या महिलेने हरीश गडदे यांचे भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र राळेगाव यांच्याकडे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत 436 रुपयांचा वार्षिक विमा काढला होता.
मृतकाचे पती शरद वसंत कोवे हे काही दिवसांनी मृत्यूचा दावा करण्याकरीता स्टेट बँक राळेगाव शाखेत माहितीकरीता आले असता त्यांना मृत्यू दाव्याची सर्व कागदपत्रे देण्यात आली. यावेळी स्टेट बँकचे प्रबंधक सीमा गौरखेडे यांना मृतकाचे जीवनज्योती योजनेत 436 रुपये कपात करून असल्याचे दिसून आले.
त्यांनी शरद कोवे यांना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेचा क्लेम करायला सांगितला. रितसर कार्यवाहीनंतर प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेअंतर्गत क्लेम मंजूर होऊन 26 डिसेंबरला 2 लाख रुपयांचा विमा मंजूर झाला. हा धनादेश आरती शरद कोवे यांचे वारस पती शरद वसंत कोवे यांना शाखा प्रबंधक वर्षा ओरके यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी उपशाखा प्रबंधक हर्षद नानोटी, सर्विस प्रबंधक सीमा गौरखेडे, प्रकाश क्षीरसागर, चांदणी गोपाळ, वैभव भांडेकर, अपूर्व भोंगाडे, हरीश गडदे, अमोल माने, योगेश ढोले, सचिन भुरकुटे व कर्मचारी उपस्थित होते