तभा वृत्तसेवा
पुसद,
deadly-knife-attack : बिडवाई नगरात बारावीत शिकणाèया तरुणासोबत जुन्या वादाचा वचपा करण्यासाठी जीवघेणा चाकूहल्ला केला. सोबतच शिवीगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना 30 डिसेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली. दुर्गेश संजय भोसले (वय 18, इटावा वॉर्ड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिस ठाण्यात मैनाबाई नगरात राहणाèया अनिल चव्हाण (18), शेफल्य (18 वर्षे) व प्रतीक (वय 18) या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दुर्गेश हा घटनेच्या रात्री 9.18 च्या सुमारास घरी होता. त्यावेळी त्याला अनिल चव्हाण याने फोन केला. फोनवर शिवीगाळ करून, ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’ तू बिडवाईनगरमध्ये ये असे म्हटले होते. त्यानंतर दुर्गेश अवधूत शिंदेला सोबत घेऊन रात्री 10 च्या सुमारास बिडवाईनगर येथे गेला.
तेथे अनिल, शेफल्य व प्रतीकसह इतर अनोळखी मुलांनी संगनमत करून तू माझा मित्र प्रतीक यास रामनवमीमध्ये का मारहाण केली, असे म्हणून वाद निर्माण केला. त्यानंतर शिवीगाळ करीत शेफल्यने त्याच्या हातातील चाकू दुर्गेशच्या नाकाजवळ मारला. त्याचवेळी इतरांनी शिवीगाळ करून मारहाण केली. सोबतच जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून घेतल्या जात आहे.