वर्धा,
rabi-season : जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात ज्वारी, गहू, चणा या पिकासोबतच जवस, मसूर व इतर पिकाची लागवड करीत असतात. जिल्ह्यात रब्बी हंगामात १ लाख १४ हजार ७६४ हेटर २१ आर क्षेत्र असून १ जानेवारीपर्यंत १ लाख १६ हजार ६५१ हेटर ९३ आर क्षेत्रावर तृणधान्य, कडधान्य, व गळीतधान्य पिकांची रब्बी हंगामासाठी पेरणी झालेली आहे.
रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ हजार २९१ हेटर ६६ आर असून प्रत्यक्ष ७३३ हेटर ३० आर क्षेत्रावर म्हणजेच ५६.७७ टके लागवड झाली आहे. तर गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ४० हजार ६६९ हेटर २९ आर असून प्रत्यक्ष ३३ हजार १८ हेटर ६५ आर क्षेत्रावर ८१.१९ टके लागवड झाली आहे. हरभर्याचे सरासरी क्षेत्र ७२ हजार १०२ हेटर ४३ आर असून प्रत्यक्ष ८२ हजार ९० हेटर ४१ आर. क्षेत्रावर ११३.८५ टके लागवड झाली आहे. इतर कडधान्याचे सरासरी क्षेत्र ४७० हेटर ८० आर असून यामध्ये प्रामुख्याने मसूर पिकाची २०५ हेटर ३० आर क्षेत्रावर ४३.६१ लागवड झालेली आहे. तर जवस पिकाचे लागवडीचे सरासरी क्षेत्र ७ हेटर असून ७३ हेटर ५० आर क्षेत्रावर १०५० टके लागवड झालेली आहे. अशी एकूण रब्बी पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्रानुसार १ जानेवारी २०२६ अखेर १ लाख १६ हजार ६५१ हेटर ९३ आर क्षेत्रावर १०१.६४ टके लागवड तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची रब्बी हंगामासाठी प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.