नववर्षाच्या पहिल्या दिवशी रामनामाचा जयघोष !

02 Jan 2026 15:26:47
नागपूर,
Ramnagar Ram Mandir इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी काही ठिकाणी जल्लोष होत असतानाच, भाजपा धार्मिक प्रकोष्ठच्या वतीने शहरातील विविध राममंदिरांमध्ये सामूहिक रामरक्षा व मारुतीस्तोत्र पठण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक आरतीने करण्यात आला.
 

nav 
 
 
या उपक्रमाचा समारोप रामनगर राममंदिरात झाला. वृंदावन येथील प्रसिद्ध भागवत कथाकार श्री गोपालानंद ठाकुरजी महाराज यांच्या आशीर्वचनाने उपस्थित भाविक भक्त भारावून गेले. पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले तसेच भाजपा धार्मिक प्रकोष्ठ नागपूर अध्यक्ष डॉ. श्रीरंग वऱ्हाडपांडे यांच्या नेतृत्वात हा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. Ramnagar Ram Mandir यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भागवत कथा व महाप्रसादाचे आयोजन शिवहरे परिवार, रविनगर यांच्या वतीने करण्यात आले.
सौजन्य: रवी वाघमारे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0