रिसोड,
Dr. Sakha Maharaj Joshi आजच्या पिढीने वाचन संस्कृती जपणे आवश्यक आहे, वाचनाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन श्री संत सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. सखा महाराज जोशी यांनी केले. ते स्वामी विवेकानंद वाचनालय तर्फे आयोजित नववर्ष स्वागत व ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी कृषी अधिकारी संजय उकळकर तर विशेष उपस्थिती म्हणून माजी प्राचार्य कमलाकर टेमघरे होते. स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन, ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. सखा महाराज म्हणाले की वाचन संस्कृती ही काळाची गरज आहे. वाचन संस्कृती व्यक्तीला सुजाण, ज्ञानी बनवते, विचार करण्याची क्षमता वाढवते, मानसिक आरोग्य सुधारते. समाजाच्या प्रगतीसाठी वाचन संस्कृती आवश्यक आहे. वाचनामुळे योग्य अयोग्य समजून घेण्याची व सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची शक्ती मिळते, असेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात संजय उकळकर म्हणाले की नवीन वर्षात आपण दररोज वाचनाचा संकल्प करू या, असे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सखा महाराज जोशी Dr. Sakha Maharaj Joshi यांच्या शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. एमपीएससी परीक्षेमध्ये प्रणाली अभिषेक लोथे उत्तीर्ण झाल्याबद्दल व स्नेहा अमोल लोथे नगर परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल अरुण लोथे यांचा सत्कार करण्यात आला. एमपीएससी मार्फत गौरी अमोल जोशी ची उद्योग निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अमोल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राजेश डवरे, माजी प्राचार्य रामचंद्र जाधव यांची समायोजित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत वसमतकर, संचालन रवी अंभोरे, आभार प्रदर्शन बी एन चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार दत्तराव इंगळे, पत्रकार गजानन बानोरे, मधुसूदन झुनझुनवाला, भगवान निर्बाण, डॉ. रामचंद्र गट्टाणी, इंगळे, प्रा. खैरे, माजी सैनिक जगन्नाथ ठोंबरे यांच्यासह वाचक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यवस्था ग्रंथपाल गजानन तारापूरे व मोहन बानोरे यांनी केली.