मंगरूळनाथ,
road safety campaign, येथील बस आगारात १ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियानास सुरुवात करण्यात आली. या कार्यशाळेत चालक व वाहकांना वाहतूक,प्रवाशी सुरक्षेसह नियमांचे पालन करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक वाहतूक अधीक्षक शैलेश राठोड, प्रमुख पाहुणे भंडार अधिकारी मेश्राम, मार्गदर्शक सारिका दीदी, प्रा. सोनोने, आगार पर्यवेक्षक दिपक विटकरे, वाहतूक निरीक्षक पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश काळे, नाना देवळे, नारायण आव्हाळे, पिंजरकर, साखरकर उपस्थित होते. यावेळी सारिका दीदी यांनी वाहन चालविताना अचानक दिशा न बदलणे, वेगमर्यादेचे पालन करणे, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे व चालकांनी वाहन चालवताना मन एकाग्र ठेवून वाहन चालवावे आदी बाबींवर भर दिला. तसेच दीपक विटकरे यांनी अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सावधगिरी, वाहनांची नियमित तपासणी आणि प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
यावेळी बस प्रवासादरम्यान दागिने चोरीच्या वाढत्या घटनांवरही चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी सावधगिरीचा इशारा देणारे पोस्टर्स लावण्याचा सुचना त्यावेळी देण्यात आल्या. या कार्यशाळेत पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा संदर्भातील माहिती फलक दाखविताना, कर्मचारी वाहक तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे चालक-वाहक प्रवाशांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत त वैयक्तिक सुरक्षिततेविषयी जागरूक निर्माण होण्यास मदत होणार कार्यशाळेला बसस्थानकातील चालक व वाहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.