जैन सेवा मंडळातर्फे सम्मेद शिखरजी यात्रेकरूंना शुभेच्छा

02 Jan 2026 19:03:37
नागपूर,
Sammed Shikharji Yatra धर्मानुरागी दिलीप शांतिलाल जैन यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी शाश्वत जैन तीर्थक्षेत्र तीर्थराज श्री सम्मेद शिखरजी येथे दर्शनासाठी २५० ते ३०० यात्रेकरूंना नेण्याचे स्तुत्य कार्य सातत्याने केले जात आहे. यावर्षीही दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुमारे २५० यात्रेकरू सम्मेद शिखरजी सिद्धक्षेत्रासाठी प्रस्थान करणार आहेत.
 

dipak 
 
या सेवाभावी कार्याबद्दल दिलीप जैन यांचा सन्मान व यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी श्री जैन सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफल व धर्मदुपट्टा देऊन सत्कार केला. Sammed Shikharji Yatra  यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष पियूषभाई शाह, महामंत्री डॉ. दीपक शेंडेकर, तसेच संजय टक्कामोरे, रविंद्र वोरा, दिलीप गांधी, शरद मचाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0