शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार, तर गुणगान शिक्षकांचे होणार!

02 Jan 2026 20:58:20
अनिल फेकरीकर
नागपूर,
scholarship-examination : गुरू हाच मुलांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतो. पण मुले यशस्वी झाली की, गुरूला विसरले जाते. आता मात्र शिष्यवृत्ती परीक्षेत तसे होणार नाही. कारण या परीक्षेत गुणवत्तेसह पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना भलेही दरमहा शिष्यवृत्ती मिळेल, मात्र त्यासंदर्भातील खरे कौतुक शिक्षकांचे केले जाणार आहे. नव्हे शिक्षकांना त्यांच्यातील कौशल्य दाखविण्याची संधीच शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमाने मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन आणि त्यांच्या सेवापुस्तकात तसा अभिप्राय नोंदवित गुणगौरव केला जाईल. याप्रकारचा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात केला जाणार आहे.
 
 
NGP
 
 
 
तुम्ही हुशार असून, होतकरू आहात पण आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कठीण वाटतेय? अशा स्थितीत चिंता करू नका. महाराष्ट्र शासनातर्फे घेतल्या जाणाèया प्रतिष्ठित शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सहभागी व्हा अन् इयत्ता 4 थीसाठी 500 रुपये आणि इयत्ता 7 वीसाठी 750 रुपये दरमहा पुढील तीन वर्षांसाठी मिळवा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येणाèया रविवार 26 एप्रिल 2026 रोजी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले आहे.
 
 
यात पहिल्यांदाच इयत्ता 4 थी आणि इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4 थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7 वी) असे दोन विभाग ठेवण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. हे ऑनलाईन अर्ज 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत भरता येतील. तर अति विशेष विलंब शुल्कासह ही तारीख 28 फेब्रुवारी 2026 ठेवण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगु, कन्नड भाषांमध्ये घेतली जाणार आहे. महाराष्ट्रात सन 1954 - 1955 पासून ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता यात आपल्या शाळेतील विद्यार्थी पात्र ठरावेत, म्हणून शिक्षकांनाही जीवाचे रान करावे लागणार आहे.
 
मुख्याध्यापकांवर शिस्तभंग होणार
 
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वपूर्ण मानली जाते. तरीही अनेकदा शाळांकडून मुलांची जन्मतारीख चुकीची टाकल्या जाते. ही कृती केल्यास तो मुलगा शिष्यवृत्तीपासून वंचित राहील. या परिस्थितीत ही कृती करणाèया मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
 
 
यामुळे मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी मुला-मुलींची जन्मतारीख टाकताना कटाक्षाने काळजी घ्यावी. विशेष म्हणजे सीबीएसई/आयसीएसई विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील, पण त्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
पात्र ठरल्यास गौरव ठरेल
 
 
शिष्यवृत्तीसाठी जे विद्यार्थी पात्र ठरतील, त्यांच्यासह कुटुंबीयांसाठी तो गौरवास्पद क्षण राहणार आहे. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना आर्थिक आधार मिळेल, स्पर्धात्मक तयारीचा सराव होईल, म्हणूनच आजच पाऊल टाका, उज्ज्वल भविष्य घडवा असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे आणि आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0