सेलू,
selu-encroachment : सेलू शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई आज शुक्रवारी नगर पंचायत प्रशासनाने केली. काहींनी नालीवर असणारे अतिक्रमण स्वतः हुन काढले तर काहींचे अतिक्रमण गजराज वापरून पाडण्यात आले. या अतिक्रमणाचा फटका अनेकांना बसत होता. हे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत होते. उशिरा का होईना पण नगर पंचायत प्रशासनाला जाग आली. यावेळी नगर पंचायत प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी शिकवणीला जाणार्या विद्यार्थिनीचा अपघात झाला होता. त्यानंतर नगर पंचायत प्रशासनाने सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या. पण, वेळेपर्यंत कोणीही स्वतः अतिक्रमण काढले नव्हते. अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात झाली तेव्हा दुकानदारांनी सहकार्य केले. उद्या शनिवारी ही कारवाई सुरू राहणार आहे.