शास्त्रीय संगीतात नववर्ष २०२६चे सुरेल स्वागत

02 Jan 2026 13:51:03
नागपूर,
Shri Sai Auditorium Shankar Nagar-१ जानेवारी २०२६ रोजी भारतीय शास्त्रीय संगीतातील शुद्धता, साधना व भावनिक स्पर्श अनुभवत नववर्षाची सुरेल सुरुवात झाली. या संगीतमय संध्याकाळी शास्त्रीय गायिका हिमानी पंत यांनी आपल्या प्रभावी गायनाने रसिकांची मने जिंकली. पं. जाई देशपांडे यांच्या शिष्या असलेल्या हिमानी पंत यांच्या सादरीकरणातून परंपरा, रियाज आणि भक्तिभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
 

chirta 
 
 
 
तबल्यावर निलेश खोडे आणि हार्मोनियमवर अक्षद जाधव यांनी समर्थ साथ दिली. Shri Sai Auditorium Shankar Nagar- हा कार्यक्रम स्क्रॅच टू स्केल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कॉन्सेप्ट अँड इव्हेंट्स स्टुडिओ, श्री साई सभागृह परिसर, शंकर नगर येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विजय जथे यांनी केले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शास्त्रीय संगीतातून संस्कृतीशी नाते जोडणारा हा उपक्रम रसिकांसाठी संस्मरणीय ठरला.
सौजन्य: विजय जथे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0