नागपूर
Sparsh Foundation आजकाल विविध पद्धतीने ३१ डिसेंबर मनविल्या जातो. समाजभान जपणाऱ्या अनेक संस्थ्या आहेत. यामध्ये स्पर्श फाउंडेशन एक ही संस्थ्या ३१ डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत नववर्षाच्या स्वागताआधी सामाजिक कर्तव्य जपत स्पर्श फाउंडेशनच्या वतीने बंदोबस्तावर असलेल्या पोलिस मित्रांसाठी गरम मसाला चहा वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सण-उत्सव, घरदार व परिवार बाजूला ठेवून अहोरात्र जनसेवेत कार्यरत असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
या वेळी स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत सुरंगळीकर, विजय लिमये व प्रवीण मुळे यांनी समाजाने अशा उपक्रमांतून माणुसकी जपावी,Sparsh Foundation त्यामुळे समाज व पोलीस यांतील अंतर कमी होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात संस्थेचे अनेक सदस्य सहभागी झाले होते. याप्रसंगी श्रुती देशपांडे यांनी उपक्रम राबविणाऱ्या सदस्यांचे आभार मानले.
सौजन्य:स्वाती सुरंगळीकर, संपर्क मित्र