मुंबई,
maharashtra-crime देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्याच्या हद्दीत नववर्षाच्या दिवशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षीय तरुणीने ४४ वर्षांच्या पुरुषाच्या खासगी अवयवावर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात संबंधित पुरुष गंभीर जखमी झाला आहे. दोघांमध्ये यापूर्वी प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडेच त्या पुरुषाने हे नाते तोडले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी पुरुषाला तातडीने मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पीडित व्यक्ती कलिना–सांताक्रूझ परिसरात आपल्या भावासह आणि दोन मुलांसोबत राहत होता. त्याच्यासोबत गावाकडील एक मित्रही राहत होता. काही वर्षांपासून त्याचे आपल्या बहिणीच्या नणंदेसोबत प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, दोघेही विवाहित असून आपापल्या कुटुंबासह राहत होते. पीडिताने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, आरोपी महिला सतत त्याला पत्नीला सोडून माझ्यासोबत राहा, असा दबाव टाकत होती. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा वाद झाले होते. या सततच्या त्रासाला कंटाळून तो नोव्हेंबर महिन्यात बिहारला गेला होता. त्या काळातही आरोपी महिला वारंवार फोन करून त्याला मुंबईला येण्याची धमकी देत होती. maharashtra-crime यानंतरही पीडिताने बराच काळ महिलेला टाळले. १९ डिसेंबर रोजी तो मुंबईत परतला, मात्र त्यानंतरही त्याने तिची भेट घेतली नाही. २४ डिसेंबर रोजी दोघांची पुन्हा भेट झाली. त्या वेळी महिलेनं, तू मला भेटायला का येत नाहीस, असा सवाल केला. यावर पीडिताने दोघांनाही मुले आहेत आणि असे नाते ठेवणे चुकीचे आहे, असे समजावून सांगितले.
दरम्यान, १ जानेवारीच्या रात्री आरोपी महिलेने पीडिताला उशिरा फोन करून नववर्षानिमित्त घरी बोलावले. ‘तुझ्यासाठी मिठाई आणली आहे,’ असे सांगत तिने त्याला घरी येण्यास सांगितले. maharashtra-crime घरी पोहोचल्यानंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मात्र अचानक महिलेने स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्या खासगी अवयवर हल्ला केला, असा आरोप पीडिताने केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.