भोपळ,
two-families-devastated-on-new-year मध्य प्रदेशातील सिवनी आणि कटनी जिल्ह्यांत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या दोन भीषण अपघातांत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनांनी दोन कुटुंबांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
सिवनी जिल्ह्यातील जबलपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास दुचाकीचा उभ्या ट्रकवर जोरदार धडक बसून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. बरघाट उपविभागाचे पोलिस अधिकारी ललित गाठरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरई पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिद्दिटेकजवळ हा अपघात घडला. परमानंद बरकडे (वय ४५), त्यांची पत्नी गीता (३८), मुलगी माही (८) आणि मुलगा दीपांशू (४) हे चौघेही या अपघातात मृत्युमुखी पडले. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकी वेगात होती, तर ट्रक बिघाड झाल्याने चार लेनच्या महामार्गावर उभा होता. two-families-devastated-on-new-year ट्रकची दुरुस्ती सुरू होती आणि वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी ट्रकच्या आसपास सूचक चिन्हे लावण्यात आली होती. मात्र तरीही दुचाकी थेट ट्रकवर आदळली आणि अपघात घडला.
दरम्यान, कटनी जिल्ह्यातही गुरुवारी सायंकाळी असाच एक भीषण अपघात झाला. रीठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोहम्मद शाहिद यांनी सांगितले की, सलैया चौकीजवळ हीरापूर आणि बडगावदरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास पिकअप वाहन आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. two-families-devastated-on-new-year दुचाकीवर चार जण प्रवास करत होते, ज्यामध्ये चार वर्षांची चिमुकलीही होती. दमोह येथून कटनीकडे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर त्या चिमुकलीसह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. चौथ्या जखमी व्यक्तीचा रीठी सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातानंतर पिकअप वाहनचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पळून गेला असून, नंतर वाहन सोडून तो फरार झाला. या अपघातातील चारही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. two-families-devastated-on-new-year मात्र दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे हे सर्व पन्ना जिल्ह्यातील रहिवासी असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून, अपघातांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.