तभा वृत्तसेवा
पुसद,
elderly-woman-beaten-up : विठाळा वार्ड येथे किरकोळ कारणावरून वयोवृद्ध महिलेला लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. सोबतच जीवाने ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. ही घटना 30 डिसेंबर रोजी घडली होती. शोभा दत्ता कुरूडे (65) रा. विठाळा वार्ड यांनी दिलेल्या तक्रारीवरून परिसरात राहणाèया पिंटू विजय वाघमारे (28), लक्ष्मी विजय वाघमारे (वय 60) वर्ष व त्यांच्या एका सहकाèया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी संगणमत करून तू त्या दिवशी आमच्या घरी कशाला आली होती, असे म्हणून शोभा कुरुडे यांना शिवीगाळ केली. त्यांचे आपसात भांडण सुरू असताना पिंटूने त्याच्या हातातील लोखंडी गजाने शोभाच्या डोक्यात मारून जखमी केले व माझ्या नादी लागशील तर तुला जीवाने मारून टाकील, अशी धमकी दिली होती. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.