आरमोरीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

20 Jan 2026 17:59:12
आरमोरी, 
महाराष्ट्र athletics competition अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन व गडचिरोली जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने 18 जानेवारी रोजी सीआरपी एफ कॅम्प एमआयडीसी गडचिरोली येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यात आली. यामध्ये भारत स्पोर्ट्स अकॅडमी आरमोरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्‍चित केले.
 
 
athletics competition
 
athletics competition यामध्ये 14 वर्षातील मुलींच्या गटात आराध्या राजू चौके हिने 300 मिटर रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. 12 वर्षातील मुलींच्या गटात स्वरा मंगेश करंडे हिने 60 मिटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक व रुचिता सचिन वनवे हिने 300 मिटर दौड स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. मुलांच्या 12 वर्षातील गटात नाविन्य नितेश मेंढे याने 60 मीटर दौड स्पर्धेत द्वितीय तसेच 300 मीटर दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. जनक गुरुदेव देवतळे याने लांब उडी स्पर्धेत द्वितीय, मयंक सोहम मरसकोल्हे याने 300 मीटर दौड स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांनी आरमोरी शहराचे नावलौकीक केले आहे. विजेत्या खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय पालक तथा भारत स्पोर्ट अकॅडमीचे संचालक महेंद्र मने यांना दिले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0