मुंबई,
amit-satam-press-conference मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी महापौरपदावर भाजपाकडून कोणतीही तडजोड होणार नाही, अशी माहिती दिली. “महायुतीला 118 जागा मिळाल्या आहेत. या जागांवर भाजपा, शिवसेना आणि रिपाईचा भक्कम पाठबळ आहे. गट स्थापन, गट रजिस्ट्रेशन यासारख्या तांत्रिक प्रक्रियांवर सध्या चर्चा सुरू आहे. महापौरपद कोणत्या पक्षाचे होईल हे महत्वाचे नाही, महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाररहित प्रशासन आणि शहराचा विकास मिळणे,” असे साटम यांनी सांगितले.

अमित साटम यांनी सांगितले की, “एक नवीन तरुण अध्यक्ष देऊन एक मोठा संदेश दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर जनजातीही भाजपला पाठिंबा देत आहेत. गेल्या 11 वर्षांत देशाचा विकास झाला आहे. आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन वर्षांत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. amit-satam-press-conference मोदी सरकारने तरुणाईला देशाचा अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे.” मुंबई महापौरपदाचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार असल्याबाबत साटम म्हणाले, “मी आणि राहुल शेवाळे या प्रक्रियेबाबत नक्की भेटणार आहोत, पण फक्त गट स्थापना, गट नेता आणि गट रजिस्ट्रेशनसारख्या तांत्रिक बाबींवर चर्चा होईल. महापौरपदाची व्यक्ती कोण असेल, याबाबत आम्ही अजून काही ठरवलेले नाही.”
बीएमसीतील स्थायी समितीवर भाजपाचा दावा असेल का, यावरही अमित साटम यांनी स्पष्ट केले, “भाजपाचे कार्यकर्ता केवळ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी काम करतो. amit-satam-press-conference अधिकार किंवा सत्तेसाठी काहीही काम करत नाही.” साटम यांनी पुन्हा स्पष्ट केले की महापौरपदाचा निर्णय महायुतीच्या जागा आणि एकत्रित पाठबळ पाहून होईल. “महापौर भाजपाचा होईल की शिवसेनेचा, हे महत्वाचे नाही. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेला सक्षम, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन मिळणे. ही निवडणूक फक्त एका पक्षासाठी नाही, तर भविष्याच्या पिढ्यांसाठी महत्त्वाची आहे,” असे त्यांनी नमूद केले.