- पाचपावलीत बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल
अनिल कांबळे
नागपूर,
प्रेयसीला नागपुरात भेटायला आलेल्या बापलेकाने तरुणीवर बलात्कार केला. Crime बलात्कार करतानाचे व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. ही विचित्र घटना पाचपावली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पाेलिसांनी बापलेकांवर गुन्हा दाखल केला. आसीफ शेख (30, रा. चंद्रपूर), रीक शेख (56) अशी आराेपींची नावे आहेत. पीडित 29 वर्षीय तरुणी संजना (काल्पनिक नाव) ही पूर्वी चंद्रपूरला राहत हाेती. आराेपी आसीफ शेखचे चंद्रपूरला कपड्यांचे दुकान आहे. ती तरुणी 2021 मध्ये त्याच्या दुकानात कपडे घ्यायला आली हाेती.
तिने कपडे खरेदी केल्यानंतर बिल तयार करण्यासाठी आसीफने तिला माेबाईल क्रमांक मागितला. Crime त्यानंतर त्याने संजनाच्या माेबाईलवर वारंवार संपर्क करुन दुकानात नवीन डिजाईनचे कपडे आल्याची माहिती दिली. यादरम्यान दाेघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली असता तिने नकार दिला. ती तरुणी त्याच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेली. त्यावेळी आसीफने चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा बसविला. त्याने कपडे बदलतानाचा संजनाचा व्हिडीओ बनविला. ताे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, त्याने तिच्याशीर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने संजनाचे अश्लील ाेटाे आणि व्हिडीओ काढले आणि तिला पैशांची मागणी केली. तरुणीने चंद्रपूर पाेलिसांकडे तक्रार केली आणि आराेपी आसीफविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पाेलिसांनी त्याला अटक केली हाेती. काही दिवसांतच त्याला जामीन मंजूर झाला. कारागृहातून बाहेर येताच, त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे तिने चंद्रपूर साेडले आणि ती नागपुरात आली.
घरात घुसून लैंगिक अत्याचार
गेल्या 10 जानेवारी राेजी सकाळी आसीफ आणि त्याचे वडिल रीक शेख आणि एक कल्याणी नावाची महिला तिच्या घरी पाेहाेचले. तिला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार देताच आसीफने जबरदस्तीने तिला पकडून ठेवले आणि रीकने तिच्यावर अत्याचार केला. आसीफने व्हिडीओदेखील काढला व ताे व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणीच्या तक्रारीवरून पाचपावली पाेलिसांनी तिघांविराेधातही गुन्हा दाखल केला आहे.