जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सखोल पाहणी
वाशीम,
जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेत आरोग्य सेवा मिळावी, हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन District Collector Yogesh Kumbhejkar जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. रुग्णालयांतील पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, स्री रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या वेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी. एस.ठोंबरे, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपकार्यकारी अभियंता अजीम शेख, आकाश कोळकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, विद्युत उपअभियंता स्वरूप सरोदे आदी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात District Collector Yogesh Kumbhejkar जिल्हाधिकार्यांनी सर्व विभागांची पाहणी करून रुग्ण व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर ऑडिट करून घ्यावे, असे निर्देश दिले. तसेच क्रीटीकल केअर ब्लॉक आणि सेवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टच्या सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी करून ही कामे ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावीत आणि कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवावे, असे सांगितले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विभागांची पाहणी करण्यात आली. कुतूहल प्रदर्शनीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकार्यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन करावे, असे निर्देश दिले. पोलीस, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, आरोग्य व शिक्षण विभागांनी सुरक्षेपासून स्वच्छतेपर्यंत प्रत्येक बाब काटेकोरपणे अंमलात आणावी, असे त्यांनी नमूद केले.
शासकीय परिचर्या महाविद्यालय पदनिर्मिती प्रस्ताव, वस्तीगृह बांधकामाचा प्रस्ताव सादर करावा जेणेकरून शासनस्तरावर पाठपुरावा करता येईल असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. या बैठकीत महाविद्यालयाच्या सध्याच्या गरजा, उपलब्ध मनुष्यबळ, विद्यार्थ्यांची संख्या, भविष्यातील विस्तार तसेच वस्तीगृह उभारणीमुळे होणारे शैक्षणिक व प्रशासकीय लाभ याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
District Collector Yogesh Kumbhejkar कुतुहल प्रदर्शनीच्या अनुषंगाने कुतुहल विज्ञान प्रदर्शन समितीचे सदस्य पत्रकार निलेश सोमाणी यांनी प्रदर्शनीचे नियोजन, मांडणी व अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत प्रदर्शनी अधिक प्रभावी व आकर्षक कशी करता येईल, यासह विविध उपक्रमांचे नियोजन, समन्वय आणि जनसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी आरोग्य यंत्रणेशी निगडित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.