पुलगाव,
Election in Pulgaon Municipality पुलगाव नगरपालिकेत आज मंगळवारी दुपारी नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करत पाचही समित्यांवर बिनविरोध कब्जा मिळवला. या निवडणुका पिठासीन अधिकारी प्रताप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी मुख्याधिकारी विजय आश्रमा, काँग्रेस व भाजपाचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समित्यांची निवड प्रक्रिया शांततेत व बिनविरोध पार पडली.
Election in Pulgaon Municipality निवडीनुसार बांधकाम समिती सभापती म्हणून शांतीदेव गंगाराम खैरकार यांची निवड करण्यात आली. स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती आफरीन अंजुम अब्दुल नजीम यांची नियुती झाली. पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून विद्या वलीवकर यांची निवड करण्यात आली. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे उपसभापती (सभापती दर्जा) म्हणून दीपक आहुजा यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून करुणा राऊत तर उपसभापती म्हणून शैला राऊत यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर काँग्रेस पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यत केला.