दावोसचा महाराष्ट्रावर विश्वास; फडणवीसांच्या एका सहीने महाराष्ट्राचे नशीब पालटले

20 Jan 2026 12:45:20
मुंबई,  
fadnavis-in-davos महाराष्ट्र हे देशातील उद्योग आणि गुंतवणुकीसाठी प्रमुख प्रवेशद्वार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दावोस येथे पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत पहिल्याच दिवशी तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे १५ लाख नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
 
fadnavis-in-davos
 
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या पुढाकाराने हे करार पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी आणि देश-विदेशातील उद्योग प्रतिनिधींनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलादनिर्मिती, आयटी-आयटीईएस, डेटा सेंटर्स, ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रांतील गुंतवणूक मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगरसारख्या भागांत होणार आहे. fadnavis-in-davos त्यामुळे उद्योगवाढीसोबतच प्रादेशिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
दावोस येथे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधीमंडळ सक्रिय असून, पहिल्याच दिवसापासून जागतिक उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची उत्सुकता दाखवली आहे. fadnavis-in-davos त्यामुळे महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे विश्वासार्ह, दीर्घकालीन भागीदारीसाठी सज्ज राज्य असून भारताच्या भविष्यासाठीचे पॉवरहाऊस म्हणून जगाला साद घालत आहे.
गुंतवणूकदारांशी झालेल्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रावरील उद्योगविश्वाचा विश्वास टिकवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. fadnavis-in-davos करारांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी वॉररूमच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल आणि उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत व दर्जेदार स्वरूपात देण्यात येतील. यंदा मागील वर्षीपेक्षा अधिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचे करार होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, हवा व पाणी गुणवत्ता नियंत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर इकॉनॉमी उभारण्यावर भर दिला जात आहे. तसेच एमएमआर क्षेत्राचा विकास आणि तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित केला असून, यामुळे व्यवसायवाढ आणि उच्च पगाराच्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत दावोस येथे एआय, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक, लॉजिस्टिक्स, जहाज बांधणी, ईव्ही आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही कंपन्यांशी गुंतवणूक करार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संबंधित प्रतिनिधींशी चर्चांचे फेरे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या MAITRI (महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष) या संस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रियेला गती मिळाली असून, यंदा उद्योगविश्वाचा महाराष्ट्राकडे ओढा अधिक वाढला आहे.
कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो यांसारख्या नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. कार्ल्सबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनीही राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे कौतुक करत लवकरच कंपनीचा आयपीओ आणण्याचे संकेत दिले. तसेच कोकाकोला कंपनीचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. एकूणच दावोसच्या पहिल्याच दिवसाने महाराष्ट्राने जागतिक पातळीवर गुंतवणुकीचा विश्वास संपादन करत देशाच्या आर्थिक वाटचालीत आपले नेतृत्व अधोरेखित केले आहे.
Powered By Sangraha 9.0