नागपूर,
Family trip लोककल्याण समितीच्या अंतर्गत आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग घेत असलेल्या झेप यशाची संस्थेच्या सर्व शिक्षक व कार्यकारिणी सदस्यांसाठी पारिवारिक मिलन व सहल आयोजित करण्यात आली. ही सहल कळमेश्वरजवळील एड. सुनील महाजन यांच्या शेतावर झाली. यावेळी एकूण २८ सदस्य उपस्थित होते.
सहलीची सुरुवात झाल्यानंतर सर्वांनी गरम नाश्ता व चहा घेतला. त्यानंतर वेगवेगळे खेळ खेळून मनोरंजनाची मजा सर्वांनी अनुभवल्या. शेतातील बोरं, मोसंबी, पेरू बागा व गहू शेती पाहत परिसरातील मोकळे व शुद्ध वातावरण सर्वांनी अनुभवले. शेतातील पिकलेल्या भाज्या व गरम-गरम चुलीवर शिजवलेले अन्न सर्वांनी चवीनुसार घेतले. Family trip सहलीत नरेंद्र नगर भागाचे संघ चालक वर्दळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सहलीसाठी प्रकल्प प्रमुख वीरेंद्रजी मल्होत्रा, राजेंद्र जोशी, दीपक ज़रगर आणि सौ. सविता जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी सहलीचा खूप आनंद घेतला आणि एकत्रित वेळ घालवून अनुभव समृद्ध केला.
सौजन्य: सुनील गव्हाणे/आसावरी कोठीवान, संपर्क मित्र