मावळ जिल्हा परिषदेसाठी अजूनही एकही अर्ज नाही

20 Jan 2026 14:24:55
वडगाव मावळ,
Zilla Parishad Election : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळचे दहा गण यांसह एकूण पंधरा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. १६) पासून सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.
 
mawal
 
 
 
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. २१) आहे, त्यामुळे आता फक्त दोन दिवस उरले आहेत. अर्ज भरण्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पहिल्या दिवशी ७४, दुसऱ्या दिवशी ४१ आणि तिसऱ्या दिवशी ४५ उमेदवारी अर्ज विकले गेले. रविवारी (दि. १८) सुटी असल्यामुळे अर्ज स्वीकारले गेले नाहीत. एकूण १५७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
Powered By Sangraha 9.0