वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी दिले निवेदन

20 Jan 2026 20:41:38
भव्य निषेध मोर्चा आक्रमक इशारा
 
बुलढाणा, 
जिल्ह्यात वाढते अवैध धंदे, गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी आणि पोलीस प्रशासनाची कथित निष्क्रियता याविरोधात बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते Mrityunjay Gaikwad  मृत्युंजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दि. २० जानेवारी रोजी निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे लोकशाही मार्गाने भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
 
 
Mrityunjay Gaikwad
 
या निवेदनात जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेली अवैध दारू, गुटखा, गांजा, मटका, बटन कॅप्सूल, बॉण्ड, पावडर आदी नशेच्या पदार्थांची विक्री, वाढती घरफोडी, वाहनचोरी, पशुधन चोरी, दरोडे तसेच अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. कोलवड येथील एका निरपराध शेतकर्‍यावर बंदुकीचा धाक दाखवून झालेल्या हल्ल्याचे आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरलेला नाही, अशी गंभीर बाबही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
 
 
Mrityunjay Gaikwad  यावेळी त्या ठिकाणी निवेदनावर प्रामुख्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना जिल्हा समन्वयक संजय हाडे, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शिवसेना उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, शिवसेना शहर प्रमुख आशिष जाधव, पाणीपुरवठा सभापती नयन शर्माविजय दुरणे,श्री मल्हारी गायकवाड, शाम पवार, बाबा शेख,शेख जावेद, मोहन पर्‍हाड, देवेंद्र खोत, निसार खान,राहुल सुरडकर,बबलु मावतवाल, प्यारेलाल हडाले, सुमित ठाकरे,उदयदादा देशपांडे, अरविंद होंडे, सुंदरखेड विजय ईल्लरकर, देवानंद दांडगे, ज्ञानेश्वर खांडवे,शुभम मराठे,मंगेश इंगळे,विष्णू ढेंबरे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे,संतोष शिंगणे,जेष्ठ अजय बिल्लारी,विजय आसने, रोहित गवळी यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शहरातील नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0