वॉशिंग्टन,
New map of America अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आणि कॅनडावर अमेरिकेचा दावा जाहीर केल्याचे फोटो आणि नकाशा सोशल मीडियावर शेअर करून जागतिक स्तरावर खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांच्या या हालचालीमुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी देखील अवाक झाले असल्याचे वृत्त आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथआउट’ वर ग्रीनलँडवर अमेरिकन ध्वज फडकवताना उभे असलेला फोटो शेअर केला. या फोटोमध्ये उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियोही उपस्थित दिसले. फोटोमध्ये ट्रम्प समोर एक फलक ठेवलेला आहे, ज्यावर लिहिले आहे, २०२६ पासून ग्रीनलँड हा अमेरिकेचा प्रदेश आहे. त्याचसोबत ट्रम्प यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये व्हाईट हाऊस दिसत असून युरोपियन देशांच्या नेत्यांसोबत बसलेल्या ट्रम्पच्या शेजारी बोर्डवर एक नकाशा आहे. या नकाश्यावर कॅनडा, ग्रीनलँड आणि व्हेनेझुएला अमेरिकेच्या भाग म्हणून दाखवले आहेत.
ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचे सांगितले. त्यांनी ग्रीनलँडला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानले असून, मी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे एक बैठक आयोजित केली आहे. ग्रीनलँड अमेरिकेसाठी धोका आहे, आम्ही मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. आम्ही एकमेव अशी शक्ती आहोत जी जागतिक शांतता सुनिश्चित करू शकते आणि आम्ही ती साध्य करू. ट्रम्पच्या या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जागतिक राजकारणात या घोषणेवरून मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.