पुणे महापालिकेचे १५ हजार कोटींचे बजेट ३० जानेवारीपर्यंत सादर होणार

20 Jan 2026 14:32:49
पुणे,
PMC Budget 2026 : पुणे महापालिकेचे २०२६-२७ आर्थिक वर्षाचे बजेट येत्या ३० जानेवारीपर्यंत सादर होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या प्राधान्यक्रमातील कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
 

pune
 
 
नवनिर्वाचित नगरसेवक महापालिकेच्या सभागृहात येतील आणि आयुक्त तयार केलेले अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले जाईल. स्थायी समितीच्या अनुमोदनानंतर ते अंतिम करून सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाईल. यंदा १५ डिसेंबरपासून निवडणूक, प्रभाग रचना आणि मतदारयाद्यांच्या कामांमुळे अंदाजपत्रक वेळेत सादर होऊ शकले नाही.
आगामी अंदाजपत्रक सुमारे १५ हजार कोटींचे राहणार आहे, ज्यात राज्य सरकारकडून येणारा सुमारे २ हजार कोटींचा जीएसटी, मुद्रांक शुल्क अधिभार आणि विविध योजनांतील अनुदान समाविष्ट आहेत.
Powered By Sangraha 9.0