अनिल कांबळे
नागपूर,
cricket match crowd भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 21 जानेवारी राेजी नागपूरच्या जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर हाेणार आहे. हा सामना बघण्यासाठी हजाराे क्रिकेट प्रेमी येणार असून क्रिकेट सामन्यांच्या गर्दीवर पाेलिसांचा ‘एआय वाॅच’ असणार आहे. तसेच या दरम्यान स्टेडियम परिसर आणि वर्धा राेडवरील वाहतूक काेंडी टाळण्यासाठी, वाहतूक पाेलिसांनी एक विशेष याेजना आखली असून वाहनांचे मार्ग आणि पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी सांगितले की, सर्व वाहनांना जामठा टी-पाॅइंटपासून प्रवेश करण्यास मनाई असेल. या मार्गाने फक्त खेळाडू आणि पंचांच्या वाहनांना परवानगी असेल. स्कूल बसेसना एनसीआयसमाेरून यू-टर्न घेत गेट क्रमांक 13 समाेरील पार्किंगमध्ये वाहन पार्क करावे लागेल. या व्यवस्थेअंतर्गतच व्हीसीए सदस्यांची वाहनेही प्रवेश करतील. वाहतूक काेंडी टाळण्यासाठी मेट्राे सेवेचा वापर करण्याचे आवाहन क्रिकेट चाहत्यांना करण्यात आले आहे. त्यांनी निश्चित मार्गांनीच यावे आणि त्यांची निश्चित केलेल्या पार्किंगमध्येच वाहने पार्क करावित. मतानी पुढे म्हणाले की, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पाेलिसांनी आपली याेजना बनवली आहे. मात्र, इतक्या माेठ्या संख्येत वाहनांची रहदारी झाल्यास वाहतूक संथ असेल. म्हणून, प्रेक्षकांनी मेट्राेच्या सुविधांचा लाभ घ्यावा. तेथून मैदानापर्यंत ीडर बस सेवा असेल.
एनसीआय मार्गाचा करा उपयाेग
नागपूरहून जामठा येथे सामन्यासाठी जाणाèया वाहनांनी वर्धा राेडवरून राष्ट्रीय कर्कराेग संस्थेसमाेरील (एनसीआय) डाव्या बाजूच्या रस्त्याने जावे. एनसीआयपासून पुढे जाताना, माऊलीनगरजवळून डावीकडे वळण घेत निश्चित पार्किंग क्षेत्रात जावे. सर्वसामान्यांची गैरसाेय टाळण्यासाठी, पाेलिसांनी वाहनांसाठी स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन मार्ग निश्चित केले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने, स्कूल बस, व्हीआयपी, पाेलिस आणि माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
वर्धा राेडने येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग
वर्धा आणि बुटीबाेरी मार्गाने जामठाकडे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग क्षेत्र ‘एफ’ (ब्रह्माकुमारी) निश्चित करण्यात आले आहे. येथे एका बाजूला दुचाकी आणि दुसऱ्या बाजूला चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. जामठा टी-पाॅइंट ओलांडणाऱ्या वाहनांसाठी, अल्ट्राटेकच्या शेजारी चारचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध असेल. येथून ीडर बसेस उपलब्ध असतील. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी प्रवेश आणि निर्गमन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक असेल. अधिक माहितीसाठी वाहतूक पाेलिसांनी जारी केलेल्या दिशानिर्देश नकाशाचा वापर करावा.
इतर वाहनचालकांनी हा मार्ग टाळावा
जामठा येथे हाेणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी न येणाèया वाहनचालकांना 21 जानेवारी राेजी सामन्यापूर्वी संध्याकाळी 5 ते 7 आणि सामना संपल्यानंतर रात्री 10 ते 11.30 या वेळेत शक्यताे या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
पार्किंग कक्ष ‘ए’ : फक्त व्हीआयपी, पाेलिस आणि मीडिया प्रतिनिधींसाठी
कक्ष ’बी’: चारचाकी वाहने
कक्ष ’सी’ : (अन्विता ार्म): दुचाकी वाहन
कक्ष ’डी-1’ : एका बाजूला चारचाकी, दुसèया बाजूला दुचाकी वाहन
कक्ष ’डी’ 2, 3, 4, 5 आणि ’ई’ (अल्ट्राटेक) : चारचाकी वाहने
कक्ष ’जी’ : फक्त सदस्यांसाठी
कक्ष ’एच’: फक्त स्कूल बससाठी
कक्ष ’आय’ : राखीव पार्किंग