मुळशी-कोळवण रेसमध्ये साखळी अपघात, प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न

20 Jan 2026 15:07:05
पुणे,
Pune Accident : मुळशी तालुक्यातील ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज नसल्यामुळे मोठा साखळी अपघात घडला. ताशी ६०-७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंपैकी ७० हून अधिक खेळाडू एकमेकांवर आदळले आणि अनेक जखमी झाले.
 
 

pune
 
 
कोळवण रोडवरील अरुंद व तीव्र वळणामुळे आघाडीच्या सायकलपटूंचा ताबा सुटल्याने मागील खेळाडूंना साखळीप्रमाणे एकापाठोपाठ आदळावे लागले. प्राथमिक उपचारांनंतर ४-५ खेळाडूंना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, तर १५ मिनिटांच्या ब्रेकनंतर रेस पुन्हा सुरु झाली.
 
या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. खेळाडूंना अरुंद रस्त्याची माहिती आधी देण्यात आलेली नव्हती, तर वळणावर बॅरिकेडिंग आणि धोक्याचे फलकही अपुरी असल्याचे दिसून आले आहे.
Powered By Sangraha 9.0