कारंजा लाड,
स्थानिक श्री क. रा. इन्नाणी महाविद्यालयाचा विद्यार्थी Roshan Wankhede in the Indian Navy रोशन वानखेडे (राज्यशास्त्र विभाग) याची भारतीय नौदलात टीएमएम या पदावर निवड झाली आहे. भारतीय नौदलात निवड होणे ही एक गौरवाची बाब आहे. कारंजा तालुयातील पिंपरी वरघट येथील सामान्य व गरीब कुटुंबातून आलेला हा विद्यार्थी आहे. त्याचे आई - वडील शेतमजूर म्हणून गावात काम करतात. घरची आर्थिक स्थिती अत्यंत जेमतेम असल्यामुळे पदव्युत्तर शिक्षणापर्यंत त्याला अनेक ठिकाणी भटकंती करावी लागली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने विविध ठिकाणी काम करून तसेच वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले.

Roshan Wankhede in the Indian Navy महाविद्यालयातील विविध उपक्रमांत त्याचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी केंद्र सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्याला प्राप्त झाली होती, ज्यामुळे त्याला आर्थिक आधार मिळाला व शिक्षणाचा मार्ग काहीसा सुकर बनला. आर्थिक अडचणी आणि नैसर्गिक न्यायाचा अभाव अशा दोन्ही पातळीवर त्याचा संघर्ष सुरू होता. परंतु अशा अडचणींना सामोरे जात त्याने आपल्या शिक्षणकार्यात कधीही खंड पडू दिला नाही. त्याचा प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द यामुळेच भारतीय नौदलात भरती होण्याची संधी त्याला मिळाली.
Roshan Wankhede in the Indian Navy देशसेवेसाठी तो आता अंदमान—निकोबार येथे कार्यरत होणार आहे.या यशामागे राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय ढेंगळे यांचे विशेषत्वाने व अन्य प्राध्यापकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील तसेच महाविद्यालयातील सर्वच घटकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याचे हे यश महाविद्यालयासाठी कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.