... अलार्म वाजला अन् चाेरांनी पळ काढला

20 Jan 2026 14:41:47
अनिल कांबळे
नागपूर,
thieves गेल्या दाेन दिवसांपासून घराला कुलूप लागून असल्याचे चाेरट्यांनी हेरले. हीच संधी साधून तीन चाेरांनी घराेडीची याेजना आखली. मध्यरात्री दबक्या पावलांनी दरवाजाजवळ पाेहचले. चाेरीच्या इराद्याने त्यांनी लाेखंडी दार कापण्याचा प्रयत्न केला. दरवाजाला ताेडताना सुरक्षा अलार्म वाजल्याने त्यांचा डाव उधळला गेला.
 

चोर  
 
 
अलार्मच्या माेठ्या आवाजाने घाबरून चाेरट्यांनी पळ काढला. हुडकेश्वर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळगीनगरातील स्वातंत्र्य सैनिक काॅलनीत राहणारे दिलीप देशमुख हे कुटुंबासह पुण्याला गेले हाेते. त्यांच्या घराला कुलप लागलेले असल्यामुळे संधी हेरून मध्यरात्री तीन चाेरट्यांनी घरात प्रवेशाचा प्रयत्न केला. चाेरट्यांनी प्रथम आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली आणि नंतर मुख्य प्रवेशद्वाराकडे निघाले. दरवाजा ताेडताच घरात बसवलेला आधुनिक सुरक्षा अलार्म सुरू झाला. अलार्म वाजल्याने संपूर्ण परिसरात गाेंधळ उडाला. लाेक जागे हाेतील या भीतीने चाेरट्यांनी पळायला लागले. अचानक घडलेल्या घटनेमुळे शेजारी उठून बाहेर आले. यादरम्यान, चाेरट्यांंनी अंधारातून पलायन केले. ही संपूर्ण घटना घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेèयात कैद झाली. ुटेजमध्ये तीनही संशयितांच्या हालचाली स्पष्टपणे दिसत आहेत.thieves घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पाेलिसांनी सीसीटीव्ही ुटेज ताब्यात घेतले. संशयितांची ओळख पटवून लवकरच त्यांना अटक केली जाईल असे पाेलिस अधिकाèयांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण आहे.
Powered By Sangraha 9.0